| |

आमच्याबद्दल

Chickoo चे ध्येय म्हणजे बालवयातील शिक्षण अधिक आनंददायी, practical आणि meaningful बनवणे.

आमचा विश्वास आहे की प्रत्येक बालकात नैसर्गिक बुद्धिमत्ता, कुतूहल आणि सर्जनशीलता असते. योग्य वातावरण, योग्य साधने आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास प्रत्येक मुलाला त्याची क्षमता विकसित करता येते.

🐵 Chickoo Anganwadi model मध्ये Gurukul मूल्ये आणि आधुनिक technology-enabled education यांचा सुंदर संगम करण्याचा प्रयत्न आहे.
Building Bright Beginnings, Shaping Limitless Futures — Chickoo Anganwadi

भारतामधील प्रत्येक बालकाला गुणवत्तापूर्ण, आनंददायी आणि आधुनिक प्रारंभिक शिक्षण उपलब्ध करून देणे. शहरातील किंवा ग्रामीण भागातील — प्रत्येक मुलाला शिकण्यासाठी प्रेरणादायी वातावरण मिळावे.

  • अंगणवाड्यांना smart learning centres मध्ये विकसित करणे.
  • खेळातून आणि अनुभवातून शिक्षण देणे.
  • बालकांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे.
  • शिक्षकांना प्रभावी learning resources उपलब्ध करून देणे.
  • आधुनिक technology आणि पारंपरिक मूल्यांचा समतोल साधणे.

पाठांतरापेक्षा विचार महत्त्वाचा

आम्ही मुलांना फक्त काय विचार करायचा हे नाही, तर कसा विचार करायचा हे शिकवण्यावर भर देतो. Learning should be:

Fun
Interactive
Practical
Creative
Child-Centric
Experience-Based

लोकप्रतिनिधींचा विश्वास

महाराष्ट्रातील मान्यवर लोकप्रतिनिधींनी Chickoo Smart Anganwadi उपक्रमाबद्दल व्यक्त केलेले अभिप्राय.

माननीय श्री. मंगेशदादा चव्हाण
माननीय श्री. मंगेशदादा चव्हाण
आमदार, चाळीसगाव विधानसभा
चिकू टेक्नॉलॉजी अतिशय सुंदर उपक्रम राबवते आहे. सर्वप्रथम मी माझ्या गावी हिंगोणे खुर्द इथे पायलट प्रोजेक्ट तयार केला. बघितल्यानंतर मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल जाणवला, त्यानंतर नाविन्यपूर्ण निधीमधून माझ्या मतदारसंघात दहापेक्षा जास्त मॉडेल अंगणवाडी करतो आहे. गोरगरिबांच्या मुलांना बालवयात अंगणवाडीमधून उत्कृष्ट शिक्षण मिळाले तर भविष्यात खूप मोठा फायदा होईल. प्रत्येकाने या उपक्रमामध्ये सहभाग घ्यावा.
माननीय श्री. किशोरआप्पा पाटील
माननीय श्री. किशोरआप्पा पाटील
आमदार, पाचोरा-भडगाव विधानसभा
शहरातल्या मुलांना प्री-प्रायमरी CBSE इंग्लिश स्कूल असतात, पण खेडेगावातल्या मुलांना अशा सुविधा नसतात — कलागुण असूनही बालवयात योग्य मार्गदर्शन मिळत नाही. अंगणवाडी हा सर्वोत्तम पर्याय आहे, म्हणून माझ्या मतदारसंघात आतापर्यंत ५० पेक्षा जास्त चिकू आदर्श अंगणवाडी मॉडेल प्रत्येक गावात तयार करण्याचा माझा मानस आहे. चिकू टेक्नॉलॉजीच्या सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा!
माननीय श्री. राजेशदादा पाटील
माननीय श्री. राजेशदादा पाटील
आमदार, तळोदा-शहादा विधानसभा
माझ्या भागातील अंगणवाड्यांची अवस्था सुधारण्यासाठी लक्ष देणे काळाची गरज होती. आदर्श अंगणवाडीची माहिती मिळताच कुठलाही विलंब न करता स्थानिक विकास निधीमधून मतदारसंघात अशी मॉडेल्स उभारण्याचा निर्णय घेतला. बालवयात शिक्षणाचा पाया मजबूत झाला तर येणारी पिढी नक्कीच आदर्श घडेल. सर्वांनी आपापल्या मतदारसंघात अशी मॉडेल्स जरूर तयार करून घ्यावीत. सर्व टीमचे खूप खूप आभार.
माननीय श्री. चिमणराव पाटील
माननीय श्री. चिमणराव पाटील
आमदार, एरंडोल-पारोळा विधानसभा
चिकू टेक्नॉलॉजीचे आभार मानावे तितके कमी आहेत. शिक्षणातील कमतरता शोधून त्यावर ते व त्यांची टीम मनापासून काम करत आहे. गुरुकुल आणि टेक्नॉलॉजी एकत्र करून अतिशय सुंदर आदर्श अंगणवाडी मॉडेल तयार केले आहे. मुलांना प्रॅक्टिकल एज्युकेशन देणे ही काळाची गरज आहे — मी माझ्या कार्यक्षेत्रात नक्कीच असे मॉडेल तयार करणार आहे. असेच कार्य पुढे करत राहा, खूप खूप शुभेच्छा!
माननीय श्री. नरहरी सिताराम झिरवाळ
माननीय श्री. नरहरी सिताराम झिरवाळ
विधानसभा उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य
गोरगरिबांच्या लेकरांना उच्च शिक्षण मिळायलाच हवे. चिकू टेक्नॉलॉजी अंगणवाडी मॉडेलच्या माध्यमातून गरजेचे शिक्षण सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे. अतिशय सुंदर उपक्रम सुरू केला आहे — नक्कीच सर्वांना फायदा होईल यात शंका नाही.
माननीय श्री. दिलीप मंगळू बोरसे
माननीय श्री. दिलीप मंगळू बोरसे
आमदार, बागलाण विधानसभा
आदर्श अंगणवाडी मॉडेल ही काळाची गरज आहे. प्रत्येक आमदार आपल्या कार्यक्षेत्राचा विकास करत असतो, पण भागातील शैक्षणिक दर्जा सुधारणे ही नैतिक जबाबदारी आहे. ही जबाबदारी समजून माझ्या मतदारसंघात आतापर्यंत २५ पेक्षा जास्त आदर्श अंगणवाडी मॉडेल तयार केली आहेत. प्रत्येकाने नक्कीच एकदा हा विचार करावा.